16 जिल्ह्यातील पिक विम्याची कार्यालय बंद होणार; शेतकऱ्यांचा विमा बुडणार

मुंबई — नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते.मात्र पिक विमा कंपनीचे कामकाज सांभाळणाऱ्या AIC कंपनीने 16 जिल्ह्यातील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी वाढणार आहेत.
AIC कंपनीचा मोठा निर्णय राज्यातील 16 जिल्ह्यांमधील पिक विम्याची कार्यालय बंद पडणार आहेत. कारण एआयसी कंपनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामधील 16 जिल्ह्यातील पिक विम्याचे कामकाज एआयसी कंपनी सांभाळते. कंपनीने हा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक विम्याच काय होणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहेआता कंपनीने बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवमाळ, सोलापूर, जळगाव, सातारा, नंदुरबार, औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, गडचिरोली, लातूर, उस्मानाबाद आणि सांगली या 16 जिल्ह्यातील पीक विम्याची कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.कंपनीने 16 जिल्ह्यातील कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांसमोर असा प्रश्न उभा राहिला आहे की, त्यांनी भरलेल्या कोट्यवधींच्या प्रीमियमचे काय होणार. परंतु या जिल्ह्यांमधील कृषी अधीक्षकांनी याबाबत तक्रार केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा प्रीमियम बुडणार नाही अशी शक्यता आहे. आता यावर काय उपाययोजना केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.