आपला जिल्हा

कोरोना : बीड द्वि शतकाच्या उंबरठ्यावर, आज सहा रुग्ण सापडले

बीडजिल्ह्याला कोरोनाचा विळखा पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. चार दिवसाच्या कालावधीतच तब्बल 45 रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी पाठवण्यात आलेल्या 263 स्वॅब पैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहे. बीड ,गेवराई, परळी, धारूर याठिकाणी हे रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यातूनच आज 263 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 254 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एक अहवाल अनिर्णित आहे. तर सहा जण कोरोणा पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.यामध्ये बीड शहरातील काळे गल्ली भागातील 1, गेवराईच्या उमापूर भागातील 1, परळीच्या एसबीआय शाखेचा एक कर्मचारी, धारुरच्या अशोकनगर भागातील एक महिला आणि अंबाजोगाईच्या देशपांडे गल्लीतील एक फिरता व्यवसायीक व सातपुते गल्लीतील एका पुरुषाचा समावेश आहे. सध्या बीड जिल्ह्यात 199 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले असून 123 व्यक्ती उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. आज घडीला जिल्ह्यातील 70 व्यक्तींवर उपचार सुरु असून तर 7 जणांचा मृत्यु झाला आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात गुरुवारी संभाव्य कोरोना रुग्ण म्हणून स्वॅब घेतलेल्या दोघांचा मृत्यु झाला होता. मात्र या दोघांचेही कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यातील एका व्यक्तीला डेंग्यू झालेला होता तर दुसर्‍याला निमोनियाची तक्रार होती. या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने सुटकेचा निश्‍वास सोडला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close