क्राईम

तिच्यामुळे तुरुंगात गेला मात्र जामीन मिळताच पुन्हा तिच्याच सोबत पळून गेला

बीड — अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय तरुणाला तुरूंगात जाव लागल.मात्र, जामिनावर बाहेर येताच जिच्यामुळे कारागृहात राहावे लागले, तिला घेऊन तो पुन्हा पळून गेल्याची घटना आष्टी तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस मनोहर नेटके वय 22 असे आरोपी तरुणाचं नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी तेजस विरोधात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात त्याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर नेटकेची तुरुंगात रवानगी झाली. मात्र, जामिनावर सुटल्यावर त्याच मुलीला त्याने फूस लावून पळवले. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलीसात तेजस नेटकेवर पुन्हा एकदा अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने आष्टी तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. मात्र, ज्या मुलीमुळे आपल्याला तुरूंगवास भोगाव लागला, त्याच मुलीला परत पळून नेल्याने नेमका गुन्हा दाखल केलेला आणि सजा भोगलेली त्यानंतर मुलीलाही पळून घेण्यात त्या मुलाला यश आलं. मग यामध्ये मुलीच्या घरच्यांनी याआधी गुन्हा दाखल केलेला खोटा होता की खरा. जर गुन्हा खरा होता तर पुन्हा मुलगी त्याच व्यक्तीसोबत का पळून जाते? असे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button