कृषी व व्यापार

शेतकऱ्यांना ऑनलाइन कीटकनाशक खरेदी करता येणार

नवी दिल्ली — सरकारने कीटकनाशक नियमांमध्ये बदल करून ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे कीटकनाशकांच्या विक्रीला कायदेशीर मान्यता दिली आहे.कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपन्यांना यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे.

यासोबतच कंपन्यांना परवाना नियमांचे पालन करणेही बंधनकारक असणार आहे.
सरकारने कीटकनाशक नियमांमध्ये बदल करून ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे कीटकनाशकांच्या विक्रीला कायदेशीर मान्यता दिली आहे. सरकारने कीटकनाशक कायद्यात बदल केले आहेत. या वृत्ताची सविस्तर माहिती देताना CNBC-Awaaz चे असीम मनचंदा म्हणाले की, केंद्र सरकारने ई-कॉमर्स वेबसाइट्सद्वारे कीटक नाशकांच्या विक्रीला कायदेशीर मान्यता दिली आहे. आता कंपन्या कायदेशीररित्या कीटकनाशके विकू शकणार आहेत. विशेष म्हणजे आता फक्त अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला कायदेशीररित्या कीटकनाशकांची विक्री करण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

असीम मनचंदा पुढे म्हणाले की, कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांना त्यासाठी परवाना घ्यावा लागेल. यासोबतच कंपन्यांना परवाना नियमांचे पालन करणेही बंधनकारक असेल. परवान्याची पडताळणी करण्याची जबाबदारी ई-कॉमर्स कंपन्यांची असेल. दरम्यान, केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, यामुळे कीटकनाशकांच्या बाजारपेठेत स्पर्धा वाढेल. घरपोच त्यांना कीटकनाशके मिळणार असल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे. भारतातील अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या प्रमुख ई-कॉमर्स कंपन्यांसह अनेक ई-कॉमर्स कंपन्यांच्या वेबसाइटवर कीटकनाशके उपलब्ध होणार आहेत. त्यामुळं आता शेतकऱ्यांना योग्य व सुरक्षित कीटकनाशके खरेदी करण्यासाठी फारसा पैसा खर्च करावा लागणार नाही. तसेच विनाकारण दुकानांमध्ये फिरण्याची गरज पडणार नाही. शेतकरी फक्त ऑनलाइन ऑर्डर देऊन किटकनाशकांची होम डिलिव्हरी मिळवू शकतात.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button