आपला जिल्हा

स्वॅब घेतल्यानंतर काही तासात दोन रुग्णांचा मृत्यू

बीडयेथील जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यात आलेल्या दोन रुग्णांचा काही तासातच मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अशोक थोरात यांनी दिली. या रुग्णांचा अहवाल काही तासातच प्राप्त होईल.
गेवराई येथील एक व्यक्ती डेंग्यूची लागण झाली म्हणून जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता तर दुसरा महिला रुग्ण हृदयविकाराने पीडित होती. हा रुग्ण बुधवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. गेवराईच्या रुग्णाच्या फुफ्फुसात पाणी झाले होते. या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोणाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले मात्र अहवाल येण्यापूर्वी या दोन्ही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लवकरच या दोन्ही रुग्णाचा आहवाल आल्यानंतर मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघडकीस येणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close