चलनी नोटांची छपाई इतिहासजमा होणार! RBI कडून डिजिटल रुपयाची घोषणा

नवी दिल्ली — भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘डिजिटल रुपया’ संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेत 1 डिसेंबर रोजी डिजिटल रुपया लाँच केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
RBI announces the launch of the first pilot for retail digital Rupee (e₹-R) on December 1. The e₹-R would be in the form of a digital token that represents legal tender. It would be issued in the same denominations that paper currency and coins are currently issued. pic.twitter.com/Q6GcwZnsWg
— ANI (@ANI) November 29, 2022
1 डिसेंबर रोजी किरकोळ डिजिटल रुपयासाठीचा (e₹-R) पहिला टप्पा लाँच करण्यात येणार आहे. लाँच करण्यात येणारा हा रुपया डिजिटल टोकनच्या स्वरूपात असेल. सध्या ज्या मूल्यांमध्ये कागदी चलन आणि नाणी जारी केली जातात त्याच मूल्यांमध्ये डिजिटल रुपया जारी केला जाईल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. याचा वापर करणाऱ्या व्यक्ती मोबाईल फोन किंवा उपकरणांमध्ये साठवलेल्या बँकांच्या डिजिटल वॉलेटमधून डिजिटल रुपयांद्वारे व्यवहार करू शकणार आहेत.