आपला जिल्हा

जमीनीचा महा घोटाळा: देवस्थानच्या जमीनीवर धनदांडग्यांचे अतिक्रमण

गेवराईतालुक्यातील विविध भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवस्थानच्या नावावरच्या शेत जमीनीचा व्यवहार पूर्णत: भ्रष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, गावगुंडानी देवस्थानच्या जमीनीवर अनाधिकृत ताबा मिळवला असून, विश्वस्त म्हणून काम करणाऱ्यांनी देवस्थानची शेत जमीन तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांशी संधान बांधून स्वतःच्या नावावर करून, अनेकांनी वाहत्या पाण्यात हात ओले केले आहेत, या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे. या सगळ्या प्रकरणात धर्मादाय विभागाचे अधिकारी व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कडे तक्रार करण्यात आल्याची चर्चा आहे.

गेवराई तालुक्यातील विविध भागात असलेल्या देवस्थान, दर्गाह यांच्या नावावर हजारो एकर जमीन आहे. ज्याची किंमत कोटीच्या घरात असून, काही ठिकाणी या जमीनी ट्रस्टच्या नावावर आहेत. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या देवस्थानच्या नावाने ट्रस्टला जमीनी दान करून, आपल्याच घरातल्या नातेवाईकांना या जमीनी वहीत करायला दिल्या आहेत. तीस – चाळीस वर्षापासून जमीनीवर त्यांचाच ताबा, मालकी आहे. आलेल्या उत्पन्नातून देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी ट्रस्टीने काम करून भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसा धर्मादाय कार्यालयाचा कायदेशीर नियम आहे. असे असताना, एकाही देवस्थानच्या मंदिर आणि परीसराचा कायापालट झालेला नाही. अनेक देवस्थानची मंदीरे मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभी आहेत. त्यामुळे, देवस्थानच्या
शेतीतून उत्पन्न मिळते की नाही ? असा प्रश्न उपस्थित झाला असून, नियमाचे उल्लंघन करून ट्रस्टच्या अनेक सभासदांनी स्वतःच्या तुंबड्या भरल्या आहेत. काही ट्रस्टी म्हणून काम पाहणार्‍या काही महाभाग सदस्यांनी देवस्थानच्या जमीनी तलाठी, मंडळाधिकारी यांच्याशी सलगी करून स्वतःच्या नावे केल्याची माहिती समोर आली असून, वाहत्या पाण्यात हात ओले केले आहेत.देवस्थानच्या नावावरच्या शेत जमीनीचा व्यवहार पूर्णत: भ्रष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, गावगुंडानी या शेत जमीनीवर अनाधिकृत ताबा मिळवला आहे. देवस्थानचे विश्वस्त म्हणून काम करणाऱ्यांनी तर त्या ही पुढे जाऊन, देवस्थानची जमीन मालकी हक्कात लावली आहे. देवस्थानच्या शेत जमीनीचा परस्पर व्यवहार करून अनेकांनी वाहत्या पाण्यात हात ओले केले असून, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे. या सगळ्या प्रकरणात धर्मादाय विभागाचे अधिकारी व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, तालुक्यातील देवस्थानच्या शेत जमीन प्रकरणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या कडे तक्रार करण्यात आल्याची चर्चा आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close