आपला जिल्हा

बीड जिल्ह्यातील या ठिकाणी सापडले कोरोना रुग्ण

बीडबुधवारी देखील 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. बीड सहा, अंबाजोगाईतील 3, परळी येथील सहा तर गेवराईत दोन रुग्ण सापडले आहे

सापडलेले रुग्ण या भागातील —

अंबाजोगाईतील मोरेवाडी मधील शिक्षक कॉलनीत परळी येथील एसबीआय बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य आहेत. 36 वर्षीय महिलेसह 13 व 15 वर्षाच्या मुलास कोरोना ची बाधा झाली आहे‌. परळीत सापडलेल्या सहा रुग्णांमध्ये 45 वर्षीय, 33 वर्षीय एसबीआय कर्मचारी तसेच सात वर्षाचा मुलगा व 71 वर्षीय वृद्धाचा यात समावेश आहे. याच बँकेचे ग्राहक असलेल्या परळीतील 46 वर्षीय इसमास आणि दादाहरी वडगाव येथील 23 वर्षीय युवक संक्रमित झाला आहे. गेवराई येथे सापडलेल्या दोन रुग्णांमध्ये 26 वर्षीय महिला इस्लामपुरा भागात तर केकत पांगरी येथे पुण्याहून आलेला 28 वर्षीय युवक कोरोना बाधित आढळला आहे. बीड शहरातील परवाना नगर स्टेट बँक कॉलनी येथे 68 वर्षीय, मक्का चौक मोमीन पुरा येथे 43 वर्षीय विद्यानगर पूर्व भागात तीस वर्षीय पुरुष तर गोविंद नगर मधील 83 वर्षीय महिला करुणा संक्रमित झाली आहे. याबरोबरच साक्षाळ पिंपरी येथे 55 वर्षीय तसेच वंजारवाडी येथे तीस वर्षीय युवकास करुणा ची लागण झाली आहे बीड तालुक्यात सापडलेल्या सहा रुग्णांपैकी तीन रुग्ण हे शहरात सुरू असलेल्या मेगा सर्वेक्षणात आढळून आले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close