मुळुकवाडीत हत्येचा थरार:पुतण्याचा चूलता चूलतीवर कोयत्याने हल्ला

नेकनूर — घरगुती वादातून चुलत्याने पुतण्याचा खून केल्याची घटना पिंपरखेड येथे घडली होती. ही ताजी असतानाच पुतण्याने जमिनीच्या वादातून चुलता-चुलतीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी मूळूकवाडीत घडली आहे. या हल्ल्यात बळीराम मसाजी निर्मळ वय 80 वर्ष यांचा मृत्यु झाला. त्यांच्या पत्नी केसरबाई बळीराम निर्मळ वय 70 वर्ष यांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान आरोपी रोहिदास विठ्ठल निर्मळ वय 50 वर्ष हा फरार झाला आहे
दोन दिवसांपूर्वी वडवणी तालुक्यातील मौजे पिंपरखेड येथे घरगुती वादातून चुलत्याने पुतण्याचा खून केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान शनिवारी मुळुकवाडी येथे रोहिदास विठ्ठल निर्मळने जमिनीच्या वादातून आपल्या चुलता आणि चुलतीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात बळीराम मसाजी निर्मळ यांचा मृत्यु झाला असून केसरबाई निर्मळ गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी नेकनूर पोलीस ठाण्याचे एपीआय शेख मुस्तफा, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पीएसआय पानपाटील, लिंबागणेश पोलीस चौकीचे पोहे. डीडुळ पोना. सचिन मुरुमकर यांनी भेट देऊन पंचनामा केला. आरोपी अद्याप फरार असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.