शिक्षक नेमणुकीसाठी चकलांबा ग्रामस्थ आक्रमक; ठिय्या आंदोलन करणार

बीड — गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या दि. 14 सप्टें 2022 च्या समायोजनातून 4 शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यापैकी फक्त एकच शिक्षक हे हजर झाले.उर्वरित शिक्षकांनी शासनाच्या आदेशाला केराची
टोपली दाखवली ते हजर झाले नाहीत. विशेष म्हणजे यामध्ये गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. या शाळेतही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. वारंवार मागणी करूनही येथील शिक्षकांच्या जागा न भरल्याने दि 28 रोजी चकलांबा येथील ग्रामस्थ बीडच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहेत
चकलंबा शाळेत 9 वी व 10 वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 320 असून या सर्व विदयार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या शाळेचा सध्याचा एकूण पट 910 असून, जिल्हातील मोठा पट असलेल्या शाळांपैकी ही एक शाळा आहे.
या शाळेतून इयत्ता 10 पुढील शिक्षणासाठी बाहेर पडलेल्या विदयार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांची हवी तितकी शैक्षणिक प्रगती होत नाही.याचे मुख्य कारण त्यांना शालेय शिक्षणात गणित,विज्ञान सारख्या विषयाचे परिपूर्ण ज्ञान मिळाले नाही गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासनाच्या उदासिनतेमुळे
येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारात जात आहे, अनेकवेळा पाठपुरावा करूनही कसलाच प्रतिसाद मिळत नसल्या कारणाने आम्ही पालक दि. 28 नोव्हें 2022 सोमवार पासून ठिया आंदोलन करणार आहोत, याची शिक्षणाधिकारी बीड यांनी नोंद घ्यावी, असा इशारा चकलांबा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.