बीड : 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान गौरव रॅलीचे आयोजन

बीड — भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त दिनांक 26 नोव्हेंबर रोजी बीडमध्ये संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
बीडमध्ये 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 26 तारखेला सकाळी 8:30 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यात येणार आहे. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधान गौरव रॅलीचा प्रारंभ होणार आहे.सदरील रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – माळी वेस – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथे रॅलीची सांगता होणार आहे. सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेत भारतीय संविधानाची अंमलबजावणी या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांची उपस्थिती असणार आहे. प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. विठ्ठल जाधव यांना आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती भारतीय संविधान गौरव दिन संयोजन समिती बीडच्या वतीने देण्यात आली आहे.