आपला जिल्हा

आज पुन्हा जिल्ह्यात 17 कोरोना रुग्ण सापडले

बीड — आज बीड जिल्ह्यातून 262 जणांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अहवालानुसार 17 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बीड व परळीत प्रत्येकी सहा रुग्ण सापडले आहेत तर गेवराई दोन सापडले आहेत.
परळी बीड अंबाजोगाई या ठिकाणी रुग्ण सापडण्याची मालिका सुरूच असून बीड व परळी मध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असले तरी दिवसेंदिवस चिंतेत भर मात्र पडत आहे. आज जिल्ह्यातून 262 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील 238 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सात जणांचे अहवाल अनिर्णित राहिले असून सतरा रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. बीड तालुक्यात सहा रुग्ण सापडले आहेत. परळी तालुक्यात देखील सहा रुग्ण आढळले आहेत. अंबाजोगाई मध्ये 3, तर गेवराई मध्ये दोन रुग्ण सापडले आहेत. मात्र प्रशासनाकडून हे रुग्ण कुठले आहेत कोणत्या भागातील आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.सतरा रुग्णांची भर पडल्यामुळे आता जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 67 वर जाऊन पोहोचली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close