क्राईम

चुलत्याने केला पुतण्याचा कोयत्याने खून

वडवणी — चुलत चुलत्यांने कोयत्याने पुतण्यावरच वार करत हत्या केल्याची घटना वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्या असून आपणच हा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.
सुरज श्रीकृष्ण शिंदे वय16 वर्ष हा रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेच्या समोरील गल्लीत उभा होता. यावेळी गावातील वीज पुरवठा खंडित झालेला होता. अंधाराचा फायदा घेऊन गणेश अर्जुन शिंदे वय 20 वर्षे याने सुरज शिंदेच्या पाठीमागून कोयत्याने वार केले. यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या डोक्याला, गालावर जबर मार लागला. सदरील घटना घडल्यानंतर ग्रामस्थ त्याठिकाणी धावून आले, सुरजला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री माजलगावचे पोलीस उपअधिक्षक धिरजकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाची चौकशी केली. दरम्यान ही हत्या कोणत्या कारणावरून करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.आज सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणातील आरोपी गणेश शिंदे हा घटना घडल्यानंतर फरार झाला होता. मात्र तो देवडी शिवारात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मयत आणि आरोपी हे चुलत चुलते व पुतणे असल्याचे सांगण्यात आले. मयत सुरज शिंदेचे वडील श्रीकृष्ण शिंदे हे परराज्यात ऊसतोडणीसाठी गेलेले होते. या घटनेने वडवणी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकणाचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button