क्राईम

न्यायालयाच्या आवारात साजरा केला वाढदिवस, 11 वकीलां विरोधात गुन्हा दाखल

बीडकायद्याच्या चौकटीत बसवत ” होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं “करण्यात वाकबगार असणारी ,कायदेतज्ञ समजल्या जाणाऱ्या वकील

मंडळींनी न्यायालयाच्या आवारातच कायद्याचे तीन-तेरा वाजवत आपल्या सहकाऱ्याचा वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी अकरा वकिलां विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीड जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. प्रविण राख यांचा मंगळवार दि. 7 जुलै रोजी वाढदिवस होता. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सहकारी मित्रमंडळींनी न्यायालयाच्या आवारातच छोटेखानी कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम जवळपास एक तासा पर्यंत चालला होता. यावेळी तोंडाला मास्क न लावणे,
सोशल डिस्टंसिंग न पाळणे,जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी फेरोज पठाण यांच्या फिर्यादीवरुन अ‍ॅड.प्रवीण राख, अ‍ॅड.अविनाश गंडले, अ‍ॅड.भीमराव चव्हाण, अ‍ॅड.प्रभाकर आंधळे, अ‍ॅड.उद्धव रासकर, अ‍ॅड.श्रीकांत साबळे, अ‍ॅड.गोवर्धन पायाळ, अ‍ॅड.विकास बडे, अ‍ॅड.श्रीकांत जाधव, अ‍ॅड.विनायक जाधव, अ‍ॅड.रोहिदास येवले यांच्यावर कलम 51 (ब), 188, 269, 270, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तात्यासाहेब बांगर हे करत आहेत. वाढदिवस साजरा केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून आम्ही कायदा कसा पायदळी तुडवला हेच या नामवंत वकील मंडळींनी दाखवून दिले. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे वीस पंचवीस वर्षापासून ही वकील मंडळी न्यायालयीन कामकाजात आहेत. अशा प्रतिष्ठित मंडळी कडूनच कायद्याचे उल्लंघन होत असल्या मुळे जनतेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close