तहसिलदार सचिन खाडे यांची डॅशिंग कारवाई; 1 कोटीचा मुद्देमाल केला जप्त

वाळू माफियांच्या लोकेशनला दिला गुंगारा
गेवराई — अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाळू चोरांच्या लोकेशनला गुंगारा देत, तहसीलदार सचिन खाडे यांनी वाळू पट्यात डॅशिंग कारवाई करून दहा केन्यासह, ट्रॅक्टर जप्त करून माफियांना चांगलाच धडा शिकवला. सदरील कारवाई दि. 24 नोव्हेंबर रोजी दु. 2 वाजता केली आहे.
वाळू माफियांची मुजोरी मोडून काढत दबंग तहसिलदार सचिन खाडे यांनी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या 10 केनी ट्रॅक्टर सह तब्बल एक कोटी रुपयांच मुद्देमाल जप्त करून वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. तालुक्यातील सावरगाव येथे तहसीलदार सचिन खाडे यांनी पथकासह गुरुवार दि.24 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वाळू माफियांच्या लोकेशन ला गुंगारा देत सावरगाव गोदापात्रात छापा टाकला यात 10 केनी सह ट्रॅक्टर ताब्यात घेत दंबग कारवाई केली. गेल्या एक महिण्यापासून महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करत असून यामुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते . राक्षसभुवन , सावरगाव ,महाळसपिपंळगाव येथे तर वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडला असल्याचे वारंवार होणाऱ्या कारवाईवरुन सिध्द होत आहे.
मागील काही दिवसात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह धाड टाकत 4 हायवा व ट्रक जप्त करून ताब्यात घेत जवळपास कोटीच्यावर मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईनंतर देखील गोदापात्रातील काही गावात वाळू उपसा सुरुच होता .
दरम्यान या कारवाईला काही दिवस उलटत नाही तोच गुरुवार दि.24 रोजी भर दुपारी 2 वाजता सावरगाव निर्जन येथील गोदापात्रात तहसीलदार खाडे यांनी पथकासह धाड टाकून अवैधरित्या वाळु उतखन्न करणारे 10 केनी सह टँक्टर जप्त करुन तब्बल 1 कोटींचा मुद्देमाल या कारवाईत जप्त केला आहे.
कारवाई करण्यात आलेले दहा टँक्टर केनीसह गेवराई येथील बसस्थानकातील आगारात लावण्यात आली आहेत. ही कारवाई तहसीलदार सचिन खाडे, नायब तहसिलदार नामदेव खेडकर , मंडळ अधिकारी परमेश्वर सानप , मंडळ अधिकारी आमलेकर, लेंडाळ , तलाठी बावस्क , आदींनी केली . दरम्यान मागील काही महिण्यांपासून गेवराई तालुक्यात महसूल प्रशासन वाळू माफियांविरोधात कारवाईचा दंडूका उगारल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.