आरोग्य व शिक्षण

अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात आणखी १७ व्हेंटिलेटर उपलब्ध

    • पालक मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्यामुळे आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ
  • कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी सुसज्जतेत भर

अंबाजोगाईजिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांवर उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयास आणखी 17 व्हेंटीलेटर नव्याने उपलब्ध झाले आहेत. यामुळे अतिदक्षता विभागात दाखल होणार्‍या गंभीर रुग्णांसाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात असलेल्या व्हेंटिलेटरची संख्या २६ झाली आहे अशी माहिती स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांनी दिली आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात व्हेटीलेटरचीे असलेली कमतरता दूर करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार प्रयत्न करण्यात आले.

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 50 बेड या दृष्टीने सुसज्ज करण्यात आले असून येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यामध्ये यामुळे भर पडली आहे.

नव्याने उपलब्ध झालेल्या सतरा व्हेंटिलेटर साठी प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून भारत हेवी इलेक्ट्रिकल्सद्वारे जवळपास 74 लक्ष रुपये किमतीच्या या व्हेंटीलेटरमुळे गंभीर व अतिगंभीर स्थिती मध्ये असणाऱ्या रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी उपयोग होईल.

पालक मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठपुराव्यामुळे स्वारातीमधील आरोग्य सुविधांमध्ये मोठी वाढ

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील बळ मिळत असून आधुनिक यंत्रसामग्री व उपचार पद्धती विकसित केल्या जात आहेत.

अनेक वर्षांपासूनची ३.० टेस्ला क्षमतेची एमआरआय मशीनची मागणी पूर्ण करतच ना. मुंडेंनी स्वारातीला २६ नवे व्हेंटिलेटर्स मिळवून दिले आहेत.

कोविड कक्ष स्थापनेपासून ते पीपीई किट खरेदीपर्यंत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणे साठी आवश्यक तितका निधी उपलब्ध करून दिला आहे.

कोरोनाशी लढणाऱ्या जिल्ह्यातील रुग्णांना व्हेंटिलेटर सह येथील वैद्यकीय सुविधा न मध्ये होत असलेल्या वाढीचा मोठा फायदा होणार आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close