आरोग्य व शिक्षण
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनाचे वृत्त खोटे; प्रकृती चिंताजनक

पुणे — ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून मिळत आहे. काल रात्री विक्रम गोखले यांच्या मुलीनं ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत.
त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.’ विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी माध्यमांना विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या,’ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही. असं असलं तरी माध्यमांमध्ये त्यांच्या निधनाच्या बातम्या येऊ लागले आहेत साडेनऊ वाजता रुग्णालया तर्फे बुलेटिन जारी करण्यात येणार आहे