आपला जिल्हा

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पार्टीला हजेरी, 1500 जण क्वारंटाईन

परळीएसबीआय बँकेतील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पार्टीला हजेरी लावली असल्याची माहिती समोर आली आहे.या दोघांपैकी एकाने सात-आठ दिवसांखाली शहरातील एका ऑफिसमध्ये तर दुसऱ्याने एका गुत्तेदार नेत्याच्या शेतात त्याच्या वाढदिवसाच्या मेजवानी घेतल्याचे समोर आले आहे.दरम्यान आरोग्य विभागाने परळी शहर आणि परिसरातील 1500 लोकांना क्वारान्टीन केले आहे.

शहरातील टॉवर चौकात असलेल्या एसबीआय च्या शाखेतील तब्बल आठ कर्मचारी कोरोना बाधित आढळून आले आहेत.त्यामुळे परळी शहरात संचारबंदी लावण्यात आली तर आसपासच्या दत्तक असलेल्या पंधरा गावात कॅन्टोन्मेंट झोन जाहीर करण्यात आला.
पॉझिटिव्ह आलेल्या दोन कर्मचाऱ्यांपैकी दोन जण वेगवेगळ्या पार्टीत हजर होते.यातील एक पार्टी एका खासगी कार्यालयात झाली जिथे दहा ते बारा जण हजर होते,यामध्ये एका कॉलेजच्या प्राचार्या सह,शहरातील प्रतिष्ठित व्यापारी होते.
तर दुसरी पार्टी एका गुत्तेदार नेत्याच्या शेतात त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झाली. यापार्टीला मोठ्या प्रमाणात लोक हजर होते.यामध्ये नेते,कार्यकर्ते,अधिकारी,दिग्गज व्यापारी यांनी हजेरी लावल्याची माहिती मिळाली आहे.आरोग्य विभागाने या सर्वांची माहिती घेण्यास सुरुवात केली असून बँकेशी संबंधित 1500 लोकांना होम क्वारान्टीन करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close