रेशन कार्ड वर “दत्ता’चा झाला कुत्ता अधिकाऱ्यावर भूंकत केल अंदोलन

कोलकता — बऱ्याच वेळा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड मध्ये अनेक वेळा चुका झालेल्या पाहायला मिळतात. मात्र एका व्यक्तीच्या राशन कार्ड वर असलेल्या नावात मोठी चूक झाली. सध्या समाज माध्यमात एक व्यक्ती अधिकाऱ्यावर भुंकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही व्यक्ती रस्त्यावर असे कृत्य का करीत आहे असा प्रश्न प्रत्येकालाच पडू शकतो.
#WATCH पश्चिम बंगाल: बांकुड़ा में राशन कार्ड में उपनाम के गलत लिखे जाने पर एक व्यक्ति ने सरकारी अधिकारी के सामने 'भौंक' कर विरोध किया गया। प्रदर्शन का वीडियो वायरल हुआ। (19.11) pic.twitter.com/yqKC58NwPg
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2022
प्रत्यक्षात असे घडले की, या व्यक्तीच्या शिधापत्रिकेत चुकीचे नाव छापण्यात आले. त्या व्यक्तीचे नाव दत्ता होते हे जाणून तुम्हालाही धक्का बसेल पण चुकून त्याऐवजी ‘कुत्ता’ असे लिहिले गेले. यामुळे त्या व्यक्तीला राग आला आणि त्याने अधिकाऱ्यांसमोर कुत्र्यासारखे भुंकायला सुरुवात केली. अवघ्या 46 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या व्यक्तीची अवस्था पाहून काही लोक हसताना दिसत आहेत. तर अनेक जण या अनोख्या आंदोलनाला दाद देत आहेत.