
बीड — एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या मजुराने पैसे काढताना दुसऱ्याची मदत घेतली. याचा फायदा घेत मदत करणारानेच एटीएम कार्ड ची अदलाबदल करत मजुराला गंडा घातल्याची घटना माजलगाव शहरात घडली. दरम्यान हे दोन्ही भामटे सिसिटीव्ही मध्ये कैद झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
शेख माजेद शेख दौला वय-32 वर्षे रा.अशोक नगर माजलगांव हा मजुर पैसे काढण्यासाठी माजलगांव शहरातील नविन बसस्थानकासमोर असलेल्या एसबीआयच्या एटीएममध्ये गेले होते.मात्र त्यांना पैसे काढता आले नाही. त्यावेळी तेथे दोन इसम आले असता शेख म्हणाले की मला माझ्या खात्यातून एक हजार रुपये काढून दया, भामट्यांनी एटीएम मशीन मध्ये कार्ड टाकायला लावला. पिन ही टाकायला लावला. मात्र पुढील प्रकिया चुकीची करुन या एटीएममध्ये पैसे नसल्याचे सांगीतले. या भामट्यांनी हात चलाखी करत एटीएमची अदला बदल करत तश्याच कलरचे दुसरे एटीएम हातात दिले. थोड्या वेळातच शेख यांच्या अकाऊंटमधील सर्व रक्कम म्हणजे 42 हजार रुपये त्या भामट्यांनी काढून घेतले. या प्रकरणी शेख यांनी माजलगांव शहर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञात दोन भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी पालवे हे करत आहे.