आपला जिल्हा

कोरोना :एसबीआय बँकेचे आणखी 2 कर्मचारी, धारूर एक पॉझिटिव्ह

बीडसोमवारी जिल्ह्यातून 197 संशयीत रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यामध्ये तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव आढळून आले आहेत. परळी धारूर अंबाजोगाई याठिकाणचे हे कर्मचारी असून यापैकी दोन जण परळी येथील एसबीआय बँकेत कर्मचारी आहेत.
परळीतील एसबीआय बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना दोन दिवसापूर्वीच तोरणा असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर परळी शहर संपूर्णपणे बंद करण्यात आले आहे. याठिकाणी संचारबंदी लागू केली असली तरी बँकेत संक्रमित झालेले रुग्ण आणखी सापडत आहेत. परळी शहरात 34 वर्षीयएसबीआय बँकेतील कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आला. तसेच अंबाजोगाई येथे राहणारा 45 वर्षीय मोरेवाडी येथील शिक्षक कॉलनीत राहणाऱा एसबीआय बँक कर्मचारी देखील संक्रमित झाला आहे. धारूर शहरातील अशोक नगर भागातील मुंबईहून आलेला दहा वर्षीय मुलगा कोरोना बाधित असलेल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातून 197 जनांचे स्वॅब पाठवण्यात आले होते. त्यापैकी 186 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आठ रुग्णांचे स्वॅब मात्र अनिर्णित राहिले आहेत. दरम्यान रुग्ण सापडण्याची मालिका आजही खंडित न झाल्यामुळे आगामी काळात जनतेला घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक बनल असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close