गेवराईत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर,टाटा टर्बोसह 25 लाखाचा मुद्देमाल जप्त

गेवराई — वाळू माफिया गोदापत्रातून चोरटी अवैध वाळू उपसा करत आसताना महसूल पथकाने आज पहाटे सावरगाव येथून एक ट्रॅक्टर व झमझम पेट्रोल पंपाजवळ एक टाटा टर्बो टेम्पो ताब्यात घेत मोठी कारवाई केली या कारवाईत एकूण 25 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
गोदापात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदार सचिन खाडे यांनी महसूल पथकाची नेमणूक केलेली आहे. मात्र गस्तीवर असलेल्या पथकाला न जुमानता वाळू माफिया चोरटी अवैध वाळू वाहतूक करत आहेत. दरम्यान पहाटे तहसीलदार सचिन खाडे यांनी पथकाला सोबत घेत बागपिंपळगाव फाटा येथून एक ट्रॅक्टर तसेच झमझम पंपावजवळून एक टाटा टर्बो टेम्पो ताब्यात घेत मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण 25 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही वाहने कारवाईसाठी तहसिल कार्यालयात लावली. ही कारवाई तहसीलदार सचिन खाडे यांच्यासह महसूल पथक मंडळ अधिकारी पखाले, तलाठी ढोपे, नरोटे, बावस्कर, कोतवाल सचिन शिंदे, शुभम गायकवाड, तांदळे, चव्हाण यांनी केली.