क्राईम

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोड्या करणारे दोघे पकडले

बीडस्थानिक गुन्हे शाखेच्य टीमला शिरूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना एका वस्तीवर छापा टाकत घरफोड्या करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश मिळाले. यावेळी पोलिसांनी दोघा जणांना अटक करून त्यांच्याकडून अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गोसावी व त्यांच्या टीमने शिरूर तालुक्यातील पाडळी येथे एका वस्तीवर छापा टाकून पप्पू लहू बोर्डे वय पंचवीस वर्ष, बाळू मनोहर बल्ल्या वय 22 वर्ष रा.गूळज या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांनी आपल्या तीन साथीदारांसह अमळनेर येथील इलेक्ट्रिकल दुकान, डोंगर किनी येथील कापड दुकान, रायमोह येथील मोबाईल शॉपी तसेच गॅरेज मध्ये चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात यश आल्यामुळे पाटोदा गेवराई अमळनेर परिसरात झालेल्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी यावेळी त्यांच्याकडून 2 लाख 48 हजार सहाशे रुपयांचा जप्त केला. सध्या पोलीस या दोघांच्या अन्य साथीदारांचा तपास करत आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भाऊसाहेब गोसावी पोलीस कर्मचारी मुकुंद तांदळे सखाराम शारुख, राहुल डोळस शेख सलीम प प्रसाद कदम सखाराम कदम आदींनी केली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close