किल्लारी परिसर पुन्हा भूकंपाने हादरला

लातूर — जिल्ह्यातील किल्लारी परिसर शनिवारी पहाटे भूकंपाच्या धक्क्याने हादरला. याठिकाणी दोन वाजून दहा मिनिटांनी 2.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे या भागातील नागरिकांनी रात्र जागून काढली.
1993 साली भूकंपाने
हाहाकार माजवलेल्या औसा तालुक्यातील भूकंपग्रस्त किल्लारी परिसरात रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवला. 2.4 रिश्टर स्केल एवढी या भूकंपाची नोंद नोंदवली गेली. या भूकंपाचा केंद्रबिंदू किल्लारी परिसर होता. अनेक वर्षानंतर या परिसरात पुन्हा भूकंपाचा धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागासह उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपग्रस्त भागात हा धक्का जाणवला होता. परिणामी भर थंडीच्या दिवसांमध्ये नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.