कृषी व व्यापार
सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; निपाणी जवळका येथे घडली घटना

बीड — शेतीला पाणी देत असताना दोन दिवसापूर्वी निपाणी जवळका येथील शेतकर्याला साप चावला होता. त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी या शेतकर्याचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने निपाणी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. रात्री अपरात्री शेतकर्यांना आपल्या पिकांना पाणी द्यावे लागते. निपाणी जवळका येथील रामेश्वर भागवतराव लोणकर हे परवा रात्री पिकाला पाणी देत असताना त्यांना साप चावला. उपचारार्थ बीड येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले होते. आज सकाळी या शेतकर्याचा मृत्यू झाला. या घटनेने निपाणी जवळका येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.