आरोग्य व शिक्षण

कोरोना वरील लस एक वर्षानंतरच, केंद्रानं दिले स्पष्टीकरण

नवी दिल्लीकोरोनावरील लसी वरून ICMR वर अनेक संस्था आणि विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. यावरून आता कोरोना वरील स्वदेशी लस 2021 पूर्वी तयार होण्याची शक्य नसल्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे

१५ ऑगस्टपर्यंत देशात करोनावरील लस उपलब्ध होईल, असा दावा ICMR ने केला होता. ICMR ने यासाठी कही निवडक हॉस्पिटल्स आणि संस्थांना ट्रायल प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देशही दिले होते. १४० लसींपैकी फक्त ११ लस या मानवी चाचणीसाठी तयार आहेत. पण ही लस पूर्णपणे तयार होण्यासाठी पुढचं वर्ष उजाडेल. त्यापूर्वी लस तयार होण्याची शक्यता नाही, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. मानवी चाचणीसाठी ११ लस तयार आहेत. यापैकी दोन लस भारतात तयार झालेल्या आहेत. ICMR आणि बायोटेकने मिळून एक बनवली आहे. तर दुसरी जायडस कॅडिला कंपनीने बनवली आहे. ६ भारतीय कंपन्या लस बनवण्यावर काम करत आहेत. ICMR ची ‘कोव्हॅक्सीन’ ही मानवी चाचणीसाठी तयार आहे. तिला मंजुरीही मिळाली आहे. जगातील १४० लसींपैकी ११ लस या मानवी चाचणीच्या टप्प्यावर आहेत. करोना व्हायरस संपण्याची ही सुरुवात आहे. करोनावरील लस ही अंधारातील प्रकाशाच्या एका किरणासारखी अपेक्षेसारखी असेल. भारत आधीही लस बनण्यात आघाडीवर होता. युनीसेफला ६० टक्के लसींचा पुरवठा हा भारत करतो, असं विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितलं.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close