ताज्या घडामोडी

🌹💐सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार 💐🌹

बीड — सामाजिक क्षेत्रात तसेच भ्रष्टाचार निर्मूलनासाठी अनोख्या लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कार २०२२ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांना रविवारी परभणी येथे प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी नेहमीच विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. सोबतच न्याय मिळावा यासाठी अनोख्या पद्धतीचे आंदोलन करण्यात ते वाकबगार आहेत. त्यांचं प्रत्येक आंदोलन हे माध्यमांसोबतच प्रशासनाचे लक्ष वेधून घेणार ठरत आला आहे. व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रातले असले तरी भ्रष्टाचाराची सर्जरी करण्यात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत
सोमेश्वर साथी लोकनिर्माण राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे रविवार 20 नोव्हेंबर रोजी परभणी येथील सिटी पॅलेस येथे दुपारी अडीच वाजता होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एकता संस्थेचे राज्य कार्याध्यक्ष अरूण मराठे अतिथी म्हणून अभिनेते अनिल मोरे, महापौर प्रताप भैय्या देशमुख, परळी औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, डॉ. वर्षा पुनवटकर आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहीती आयोजक अजमत खान, संपादक बालासाहेब फड यांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button