आपला जिल्हा

बीडला कोरोना चा विळखा: बीड, परळी ,अंबाजोगाई ,आष्टीत सापडले सहा रुग्ण

बीडजिल्ह्याची चिंता वाढत चालल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे आज पाठवण्यात आलेल्या 248 स्वॅब पैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. बीड शहरात दोन, अंबाजोगाईत एक आष्टी तालुक्यात दोन तर परळीत एक रुग्ण सापडला आहे.

रविवारी सुद्धा संशयित रुग्णांचे पाठवण्याची संख्या विक्रमी म्हणजेच 248 होती. यात 239 जणांचे अहवाल निगेटिव आले आहेत. तिघा जणांचे अहवाल अनिर्णित राहिले आहेत. आज पुन्हा नव्याने सहा रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. बीड शहरातील जुना बाजार परिसरात 38 वर्षीय महिलेस व अकरा वर्षे मुलास कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. अंबाजोगाई शहरातील संत कबीर नगर मध्ये अलिबाग येथून आलेली चाळीस वर्षीय महिला कोरोना बाधित निघाली‌. याबरोबरच आष्टी तालुक्यातील सुरडी येथील मुंबईहून आलेली तीस वर्षीय महिला तसेच गंगादेवी येथील 65 वर्षीय पुरुषास कोरोनाची बाधा झाली आहे. परळी शहरात आज पुन्हा नव्याने एका रुग्णाची भर पडली आहे. दरम्यान काल बँकेतील पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव आढळून आल्यानंतर संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी परळी शहर व आसपासची सोळा गाव लाॅक डाऊन करण्यात आली आहेत त्याबरोबरच संचार बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या 33 वर जाऊन पोहोचली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close