कृषी व व्यापार

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित; विजयसिंह पंडित यांचे महावितरण समोर धरणे

गेवराई — महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त आहे, पिकांना पाणी देण्याच्या दिवसात महावितरणकडून कृषीपंपाचे विज कनेक्शन तोडले जात आहेत. एकीकडे मुख्यमंत्री शेतकर्‍यांची विज तोडू नका असे जाहिर सांगत असताना महावितरणने मात्र शेतकर्‍यांचे विज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. मात्र यापुढे जर अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट कराल तर मी तुमचे तोंड काळे करून माझा इंगा दाखवून देईल असा ईशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना दिला आहे. यापुढे सुधारणा झाली नाही तर तालुकाभरात असहकार आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकर्‍यांच्या मागण्यांच्या संदर्भात विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली गेवराई राष्ट्रवादीच्या वतीने आज शुक्रवार, दि.18 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून महावितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, कोरोना संक्रमणाच्या कठीण काळानंतर शेतकरी सावरत असताना महावितरणकडून कृषीपंपाच्या विज तोडणीचा शॉक त्यांना दिला जात आहे. शेतकर्‍यांकडील थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने एैन पिकाला पाणी देण्याच्या दिवसांत विज तोडणी सुरु करून शेतकर्‍यांना खिंडीत गाठले आहे. एकीकडे योग्य दाबाने विज पुरवठा होत नाही, दिवसभरात सतत भारनियमन केले जाते, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होत नाहीत, सातत्याने लाईन ट्रीप होते, ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी अक्षरशः वर्गणी करून शेतकर्‍यांना पैसे द्यावे लागतात, 33 के.व्ही.उपकेंद्राची दुरुस्ती होत नाही, खेडेगावात विज वाहक तारा लोमकाळत असून धोकादायक झाले आहे यांसह अनेक समस्या असताना केवळ शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे काम महावितरण कंपनीकडून होत असल्याचा आरोप विजयसिंह पंडित यांनी केला आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांकडून या बाबत कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचेही विजयसिंह पंडित यांनी सांगितले. तर यापुढे सुधारणा झाली नाही तर तालुकाभरात आ सहकार आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाऊसाहेब नाटकर, श्रीराम आरगडे, भाऊसाहेब माखले,कल्याण चव्हाण गजानन काळे, ऋषिकेश बेदरे, यांच्यासह आदींनी आपले मनोगत व्यक्त करत वीज वितरण कंपनीच्या विरोधात निषेध व्यक्त केला.
यावेळी बाजार समितीचे सभापती जगनपाटील काळे, जयभवानीचे व्हाईस चेअरमन जगन्नाथ शिंदे, बाळासाहेब मस्के, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, जिल्हा परिषद सदस्य फुलचंद बोरकर, माजी सभापती बाबुराव जाधव, बाळासाहेब मस्के, कुमारराव ढाकणे, भरतराव खरात, बबनराव मुळे, अप्पासाहेब गव्हाणे, पाटीलबा मस्के, बप्पासाहेब मोटे, मोहम्मद गौस, उपसभापती शाम मुळे, संदीप मडके, नंदकुमार गोर्डे, परिक्षित जाधव, सुभाष मस्के, श्रीराम आरगडे, बळीराम खरात, अण्णा गवारे, डॉ.विजयकुमार घाडगे, पांडुरंग कोळेकर, संभाजी पवळ, राजेंद्र वारंगे, विकास सानप, शाम येवले, दिपक आतकरे, ऋषिकेश बेदरे, दत्ता दाभाडे, दत्ता वाघमारे, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button