देश विदेश

उद्या शनिवारी बँकांचा देशव्यापी संप; बँकिंग सेवा ठप्प राहणार?

मुंबई — उद्या म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी बँकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. या देशव्यापी संपामुळे बँकेच्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान देशभरात बँकिंग सेवा ठप्प होऊ शकतात.

19 नोव्हेंबर रोजी बँकांचा संप
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) ने कॅथोलिक सीरियन बँक आणि डीबीएस बँकेच्या कर्मचार्‍यांना 11 व्या द्विपक्षीय वेतन सुधारणा नाकारण्यासह कायमस्वरुपी नोकऱ्यांचे आऊटसोर्सिंग (कॅश मूव्हमेंट जॉब आणि हाऊसकीपिंग जॉब) आणि काही बँकांमधील नोकरीच्या सुरक्षिततेला धोका यासह अनेक मुद्द्यांच्या निषेधार्थ 19 नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेत कोणताही सकारात्मक किंवा समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे बँक संघटनांनी 19 नोव्हेंबरचा नियोजित देशव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. “आयबीए आणि बँक व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे 19 नोव्हेंबर नियोजित संप सुरुच ठेवू असं आम्ही त्यांना सांगितलं. तसंच मुख्य कामगार आयुक्तांनाही कळवलं आहे, असं एआयबीईएचे सरचिटणीस व्यंकटचलम यांनी सांगितलं.”बायपार्टाइट सेटलमेंट (BPS) च्या तरतुदींमध्ये कोणताही बदल किंवा जोडणी परस्पर केली जाऊ शकते अशी आमची सूचना असूनही,आऊटसोर्सिंग, कर्मचार्‍यांची फिरती बदली, शिस्तभंगाच्या कृती प्रक्रियेचे पालन, ट्रेड युनियन प्रतिनिधित्व, नोकरी सुरक्षा यावर त्यांचे निर्णय मागे घेतील, असे कोणतेही स्पष्ट आश्वासन ते देऊ शकले नाहीत, असंही व्यंकटचलम पुढे म्हणाले.
दरम्यान केंद्र सरकारने आयबीए आणि बँक युनियनला 16 नोव्हेंबर रोजी चर्चा सुरु करुन संप टाळण्यासाठी तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. दिल्लीत सीएलसी रामिस थिरु यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सलोखा बैठकीत हे निर्देश देण्यात आले होते. परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने उद्या बँकांचा देशव्यापी संप होणार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button