क्राईम

विहिरीत बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आईचाही मृत्यू

केज — तालुक्यातील जिवाची वाडी येथील ऊस तोडीसाठी गेलेल्या माय लेकराचा विहिरीत बुडून मेल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात असलेल्या विठ्ठल साई साखर कारखान्याच्या आवारात आज सकाळी 11च्या सुमारास घडली.सोहम वय चार वर्ष आणि सोनाली संतोष घुले वय 24 वर्ष अशी मृत माय लेकराची नावे आहेत.

जिवाचीवाडी येथील ऊसतोड मजूर संतोष दशरथ घुले हे आपल्या कुटुंबासह उमरगा तालुक्यात असलेल्या विठ्ठल साई साखर कारखान्याला ऊस तोडणी साठी गेले होते.आज सकाळी सोनाली संतोष घुले मुलगा सोहम यास सोबत घेऊन पाणी आणण्यासाठी आई-लेक गेले होते. यावेळी चलत  चलत सोहम हा विहीरीत पडला त्यास वाचविण्यासाठी आई सोनाली हिने पाण्यात उडी घेतली. यावेळी दोघेही पाण्यात बुडाले. यात दोघांचाही मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आई-लेकराचे शव पाण्यातून बाहेर काढले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button