आपला जिल्हा

वैद्यनाथाची नगरी आजपासून लाॅक डाऊन; संचारबंदी लागू

परळीटॉवर जवळ असलेल्या एसबीआय बँकेतील पाच कर्मचाऱ्यांना कोरोना बाधीत झाल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी परळी शहरात 12 जुलै पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. बँकेत होणारी गर्दी पाहता समूह संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे.

परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.इतर भागामध्ये कोणाचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी आजपासून परळी शहर दि.१२ जुलै रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात येवून कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली.
तसे आदेश  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी मध्यरात्री दिले.शहरातील बँक ऑफ इंडियाचे एकूण पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानं शहरात प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. बँकेत शहरातील तसेच परिसरातील नागरीकांची ये-जा झाल्यानं परळी शहरातून इतर भागामध्ये कोरोनाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी संचार बंदी लागू करण्यात येऊन शहर सात दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

दरम्यान या काळात कोणाला ही शहराबाहेर जाता किंवा कोणालाही शहरात येता येणार नसून नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसे निर्देश जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिले आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close