आपला जिल्हा

परळीकरांची चिंता वाढली, एसबीआय चे पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

परळी  —  येथील टॉवर जवळ असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पाच कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागतात त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या पाचही कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे परळीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
परळी शहरातील टॉवर परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या शाखेतील सहा जणांना गूरूवारी अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना शुक्रवारी बँकेत येण्या साठी रोखले होते.त्यांच्या स्वॕबचे नमुने आरोग्य प्रशासनाने घेतले होते घेऊन अंबाजोगाई येथील Covid-19 सेंटरला पाठवण्यात आले होते ते अहवाल आता नुकताच प्राप्त झाले असून पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव आल्याने खळबळ उडाली आहे एसबीआय बँकेची शाखा हीच तालुक्यातील एक मोठी व्यवहार असणारी बँक आहे यामुळे कर्मचाऱ्या पासून अनेक लोकांचा संपर्क आल्याची शक्यता नाकारता येत नाही हे कोरोना पॉझिटिव नागरिकांकडून अजून किती लोकांना संसर्ग झाला असेल हे आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे.दरम्यान ज्या लोकांचा या बॅंकेच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क आला असेल संपर्क अशा व्यक्तींनी स्वतःहून प्रशासनास माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close