आरोग्य व शिक्षण

आष्टी तालुक्यातील एकास कोरोनाची बाधा

अहमदनगरदोन दिवसांपूर्वी शिरूर कासार येथील नगर येथे कोरोना पॉझिटिव असल्याचे उघडकीस आल्यानंतर आज पुन्हा आष्टी तालुक्यातील कारखेल येथील 35 वर्षीय पुरुषास कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे.
नगर जिल्ह्याच्या सरहद्दीपासून जवळच असलेल्या आष्टी तालुक्यातील कारखेल येथील 35 वर्षीय व्यक्ती अहमदनगर येथे गेला असता संशयावरून त्याच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. यात हा इसम कोरोना पॉझिटिव निदर्शनास आले आहे. यासंदर्भातील माहिती नगरच्या सामान्य रुग्णालयाने अद्याप बीड जिल्हा प्रशासनाला दिलेली नसल्यामुळे या रुग्णांची नोंद बीड जिल्ह्यात अद्याप झालेली नाही. मात्र डोंगर पट्ट्यात देखील कोरोना चा शिरकाव झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close