आपला जिल्हा

गेवराई तालुक्यात शेती कामाला आला वेग; पेरले ते उगवल्याने खरीप हंगाम जोरात

गेवराई — अनेक वर्षांनंतर वेळेवर आलेल्या आणि दमदार बरसलेल्या पावसाने यंदाच्या खरीप पेरण्या उरकल्यावर, पेरले ते उगवल्याने तालुक्यातील विविध भागात मशागतीला वेग आला असून, रानावनात पिका बरोबर सगळी कडे माणसच माणसे दिसू लागली आहेत. खुरपणी आणि पाळ्या घालणे सुरू असल्याचे आनंदी चित्र दिसत आहे. शेतात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाफसा नाही , त्यामुळे शेतकर्‍यांना आंतर मशागतीचे कामे करायला अडचणी येत आहेत.

गेवराई तालुक्यातील विविध भागात 3 जूलै पर्यंत दमदार पाऊस झाला आहे. गेवराई – 42 ,उमापुर – 33 ,धोंडराई – 26 ,चकलांबा – 40 , मादळमोही – 40 ,पाचेगाव- 43 ,सिरसदेवी – 45 ,जातेगाव- 41, तलवडा – 45 आणि रेवकी परीसरात – 48 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांनी मे च्या शेवटच्या आठवड्यात शेतीची कामे पूर्ण केली होती. त्याचा फायदा शेतकर्‍यांना झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाळी गणित बिघडलेले होते. परंतू , दोन तीन वर्षांपासून पावसाने धीर दिला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना सुगीचे दिवस अनुभवायला मिळाले आहेत. या वर्षी सुद्धा पाऊस वेळेवर झाल्याने चिंता मिटली आहे. कपाशी, बाजरी, तूर, मूग, उडीद, मटकी, हुलग, आदी पिके घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल राहीला आहे. या वर्षी उस आणि कापसाचे क्षेत्र वाढले आहे. उस लागवड ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. कापूस उत्पादकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील शेतकरी फळ लागवडी कडे वळला असून, येथील कृषी विभागाने शेतकर्‍यांना मार्गदर्शन केल्याने शेतकर्‍यांना फायदा झाल्याचे चित्र आहे. दरम्यान
अनेक वर्षांनंतर वेळेवर आलेल्या आणि दमदार बरसलेल्या पावसाने यंदाच्या खरीप पेरण्या उरकल्यावर, पेरले ते उगवल्याने तालुक्यातील विविध भागात मशागतीला वेग आला असून, रानावनात पिका बरोबर सगळी कडे माणसच माणस दिसू लागली आहेत. खुरपणी आणि पाळ्या घालणे सुरू असल्याचे आनंदी चित्र दिसत आहे. महीला मजुरांना काम मिळाले असून दोनशे रुपये रोज मिळू लागला असून, शेतकरी आणि शेत मजुरांनी पांडुरंगाचे आभार मानले आहेत. महीला मजुरांना काम मिळाले असून दोनशे रुपये रोज मिळू लागला असून, शेतकरी आणि शेत मजुर समाधान व्यक्त करत आहेत. तालुक्यातील विविध भागात पावसाने वेळेवर हजेरी लावली आहे. शेतकर्‍यांना, कोरोना सारख्या महामारीच्या पाश्र्वभूमीवर पाॅझिटीव्ह बातमी आल्याने आनंद झाला आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close