क्राईम

निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणी जानकी सीड्स, यशोदा सीड्स, ग्रीन गोल्ड सिडस् कंपनीविरोधात गुन्हा दाखल

बीडशेतकऱ्यांनी पेरलेली सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याची प्रकरणे पुढे आल्यानंतर कृषी विभागाच्या समितीने शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघडकीस आले. परिणामी बीड पोलीस ठाण्यात व परळी शहर पोलिस ठाण्यात जानकी सीडस अॅंड रिसर्च प्रा लि म्हैसपुर जिल्हा अकोला, यशोदा हायब्रीड सीड्स हिंगणघाट जिल्हा वर्धा तसेच ग्रीन गोल्ड सीड्स प्रा लि औरंगाबाद या तीन कंपन्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यंदाच्या खरीप हंगामात बोगस बियाणांमूळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. याची दखल घेत औरंगाबाद उच्च न्यायालयाने बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. जानकी सीड्स अँड रीसर्च प्रा लि व यशोदा हायब्रीड सीड्स हिंगणघाट या बियाणे कंपन्यांनी बीड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बियाणे विक्री केली. हे बियाणे उगवलेच नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केल्या. जानकी सीड्स च्या 117 व यशोदा सीड्सच्या 40 तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या होत्या. बियाणे तक्रार निवारण समिती ने प्रत्यक्ष पेरणी क्षेत्रावर जाऊन पहाणी केल्यानंतर बियाणे न उगवण्यामागे अनेक गंभीर बाबी असल्याचे उघडकीस आले. बियाणे निकृष्ट असल्यामुळेच ते उगवले नाही. परिणामी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जानकी सीडस् चे अनिल रमेश धुमाळे, यशोदा सीड्स चे प्रदीप माणिक पाटील यांच्या विरोधात बियाणे कायदा 1966 चे कलम 6 बी, 7 बी बियाणे नियम 1968 अंतर्गत २३ए(1) भा द वि कलम 420 नुसार बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परळी शहर ठाण्यात ग्रीन गोल्ड सीड्स प्रा. लि. औरंगाबाद या कंपनीविरोधात तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे यांनी तक्रार दाखल केली. ग्रीन गोल्ड चे वाण जी-3344,जे – 3553 , जी – 306 या बियाणांची उगवणक्षमता पाच ते 40 टक्के असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी कंपनीसह व्यवस्थापक संदीप मच्छिंद्र बावस्कर रा. गंगापूर जि.औरंगाबाद विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close