आपला जिल्हा

भूम तालुक्यातील गिरवली चा एक व बीडमध्ये एक कोरोना रुग्ण सापडला

बीडआज बीड जिल्ह्यातून विक्रमी म्हणजे 188 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते यात 173 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून पुन्हा दोन रुग्ण सापडले आहेत. एक रुग्ण शहरातील अजिज पुरा भागातील असून दुसरा रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील गिरवली येथील आहे.

आज 188 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आल्यामुळे या अहवालातून आकडा आणखी किती वाढतो याची चिंता लागून राहिली होती. मात्र थोडी काळजी असली तरी विशेष चिंता करण्यासारखी परिस्थिती उत्पन्न झाली नाही. 173 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 13 जणांच्या अहवालात मात्र कुठलाही निष्कर्ष निघू शकलेला नाही. बीड शहरातील अजीजपुरा भागात 17 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. तर दुसरा रुग्ण भूम तालुक्यातील गिरवली येथील पंचवीस वर्षीय महिला आहे. मात्र गिरवलीच्या या कोरोना बाधित महिले विषयीची सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close