आरोग्य व शिक्षण

जिल्ह्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालय 31 जुलै नंतरच उघडणार

बीडलाॅक डाऊन चा कालावधी 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्यामुळे सहा जुलै पासून सुरु होणाऱ्या माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय 31 जुलैपर्यंत न सुरू करण्याचे आदेश आज शिक्षण विभागाने दिले आहेत.

शिक्षण विभागाने सहा जुलैपासून शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन केले होते. यासंदर्भातील सर्व सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या होत्या. ज्या शाळां, महाविद्यालयामध्ये लोकांना कोरंटाईन केले गेले होते अशा ठिकाणी सॅनिटायझेशन करण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने लाॅक डाऊनचा कालावधी वाढवल्यामुळे पुन्हा निर्णय बदलण्यात आला. आता शाळा महाविद्यालय 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत या देशानुसार 9वी,10वी आणि अकरावी, बारावी चे वर्ग आता 31 जुलै नंतर सुरू करण्यात येणार आहेत,मात्र शाळा आणि महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांनी शाळेत हजर राहून आपले दैनंदिन कामकाज करावे असे म्हटले आहे .
55 वर्षापेक्षा अधिक वय असणारे शिक्षक तसेच दमा,मधुमेह,रक्तदाब असणाऱ्या शिक्षकांनी वर्क फ्रॉम होम करावे असेही सूचित केले आहे,त्यामुळे आता 31 जुलै नंतर माध्यमिक चे वर्ग आणि त्यानंतर प्राथमिक चे वर्ग सुरू होतील असे दिसते आहे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close