ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; 18 डिसेंबरला मतदान

बीड – राज्य निवडणूक आयोगाने आज दि.9 नोव्हेंबर रोजी राज्यातील 7751 ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला.बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायत साठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे..
ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला असून 18 नोव्हेंबर रोजी तहसीलदार निवडणुकांची नोटीस प्रसिद्ध करणार आहेत.
28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 5 डिसेंबर रोजी प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.7 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे 7 डिसेंबरलाच निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येतील व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल.18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या कालावधीत मतदान घेण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जाणार आहेत. दरम्यान बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होऊन 20 डिसेंबरला गाव कारभारी कोण असतील यावर शिक्कामोर्तब होणार आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक 132 ग्रामपंचायत तर शिरूर कासार तालुक्यात सर्वात कमी 24 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.