आपला जिल्हा

बीड शहरात दोन तर केज तालुक्यातील भाटुंब्यात दोन कोरोना रुग्ण सापडले

बीडबुधवारी बीड शहरात तीन कोरोना रुग्ण सापडल्यानंतर समूह संसर्ग होऊ नये यासाठी बीड शहर संपूर्णपणे लाॅक डाऊन करण्यात आले. आज जिल्ह्यातून 159 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यात चार रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून शहरात दोन तर केज तालुक्यातील भाटुंबा येथे दोन रुग्ण सापडले आहे.
कोरोनाची साखळी दोन ते तीन दिवस खंडित होते व ती पुन्हा पूर्वपदावर येते असे चित्र आतापर्यंत पहावयास मिळाले आहे. काल बीड शहरात तीन रुग्ण सापडले त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी समूह संसर्ग होऊ नये यासाठी सतर्कता बाळगत बीड शहर सात दिवसांसाठी पूर्णपणे लाॅक डाऊन केले. त्यानंतर आज जिल्ह्यातून विक्रमी म्हणजे 159 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 155 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पुन्हा आज चार रुग्ण सापडले आहेत. बीड शहरातील आसिफ नगर मध्ये 37 वर्षीय पुरुष व अजिजपुरामध्ये 44 वर्षीय पुरुषास कोरोना असल्याचे उघडकीस आले. तर केजची चिंता पुन्हा वाढली आहे. तालुक्यातील भाटुंबा येथे औरंगाबाद येथून आलेले 38 वर्षीय पुरुष व तीस वर्षीय महिलेस कोरोणा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यात आता सक्रिय रुग्णांची संख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close