देश विदेश

दिल्ली उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात भूकंपाचे जोरदार धक्के

नवी दिल्ली –दिल्ली एनसीआर ते उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, कानपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी रात्री भूकंपाचे दोन धक्के जाणवले. रात्री 8.52 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 इतकी असल्याचे समजते. यानंतर मध्यरात्री 1.57 वाजता पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता 6.3 इतकी मोजली गेली आहे.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र होते. एनसीएसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली होती.रात्री उशिरा भूकंपाच्या धक्क्यानेदिल्ली-एनसीआर मध्ये लोकांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. 9 नोव्हेंबर रोजी रात्री उत्तर प्रदेशातील अनेक भागात 1.57 च्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले.20 सेकंद जमिन थरथरत होती. मात्र, या भूकंपामुळे कुठलेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
राजधानीपासून नोएडा, गुडगाव, गाझियाबाद आणि इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र भारत-नेपाळ सीमेवरील धारचुला भागात जमिनीपासून 10 किमी खाली आहे. तर नेपाळच्या कुळखेतीमध्ये भूकंपाचा दुसरा धक्का बसला असल्याचे सांगितले जात आहे. भूकंपामुळे कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी 19 ऑगस्टच्या रात्री उशिरा लखमाऊ आणि परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्याची तीव्रता 5.2 इतकी होती.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button