आपला जिल्हा

व्यापारी तनवीर युनूस मोमीन यांचा हृदयविकाराने मृत्यू

गेवराई —  येथील एका दुकानाचे मालक तनविर युनूस मोमीन ( वय ३५ ) यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि.2 रोजी पहाटे सहा वाजता घडली आहे. घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असून, गुरुवारी दुपारी चार वाजता त्यांच्यावर येथील कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला.
या बाबत मिळालेली माहिती गेवराई शहरातील भिमनगर भागातील तनविर युनूस मोमीन ( वय ३५ ) यांचे गेवराई शहरातील शास्त्री चौका जवळ शालीमार बेल्ट व अत्तराचे दुकान असून ते बुधवार दि.१ रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी सहा वाजता दुकान बंद करून घरी गेले. पहाटे अचानक मोमीन तनविर यांच्या छातीत कळ आल्याने त्यांना तात्काळ गेवराई येथील माणिक हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डाॅक्टरने पुढील उपचारासाठी बीडला घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी चार वाजता त्यांच्यावर येथील कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. मोमीन तनविर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. बुधवारी दिवसभर त्यांनी दुकान सांभाळले होते. शास्त्री चौकातील व्यापारी व नागरिकांशी त्यांचा खुप स्नेह होता. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close