क्राईम

गुजरातला काळ्या बाजारात जाणारा तांदूळ पकडला;45 लाखांचा मुद्देमाल जप्त

माजलगांव — गुजरातच्या काळ्या बाजारात जाणारा शासकीय तांदूळ पकडत जिल्हा पोलिसांनी तब्बल 45 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ पोलिसांनी ही कारवाई केली.आयपीएस अधिकारी बी. धीरजकुमार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. यात जयश मुकुंद पगारे, विकास संजय हिवराळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 14 टायर ट्रक क्रमांक एम.एच. 21 , बीजी 2218 या ट्रक मधून शासकीय तांदूळ तालखेड फाट्यावरून जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. यावरून आयपीएस बी . धीरजकुमार यांनी माजलगाव तालुक्यातील तालखेड फाट्याजवळ ट्रक अडवला . यावेळी पोलिसांनी ट्रकमध्ये असणाऱ्या तांदळाच्या पोत्यांची तपासणी केली.

यात शासकीय तांदूळ दिसून आला. मोजणीनंतर जवळपास 29 टन इतका तांदूळ भरला. 25 रुपये प्रतिकिलो बाजारभावाप्रमाणे या तांदळाची किंमत 7 लाख 34 हजार पाचशे रुपये होते . तर पकडलेल्या ट्रकची किंमत 38 लाख रुपये आहे असल्याची माहिती पोलिसांनी दिली
दरम्यान, सदरील ट्रक हैदराबाद वरून भरून गुजरातच्या काळ्या बाजारात जात असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पो.ना. अतिशकुमार देशमुख यांच्या फिर्यादीवरून आरोपी जयश मुकुंद पगारे, विकास संजय हिवराळे रा. इब्राहिमपूर, ता. भोकरदन, जि. जालना याच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button