नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू

गेवराई — नवविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना निपाणी जवळका तांडा येथे सोमवार दि.7 नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पांडुरंग राजाभाऊ चव्हाण वय 22 वर्ष असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे. या तरुणाचा विवाह पौळाचीवाडी येथील एका मुली सोबत झाला होता. लग्नाला 21 दिवस झाले होते. सोमवार दि.7 नोव्हेंबर रोजी रात्री दोघे नवरा-बायको नेहमी प्रमाणे झोपण्यास गेले. रात्री 10 च्या सुमारास पांडुरंग चव्हाण याची पत्नी खोली बाहेर ओरडत आली व घरच्यांना त्यांचे अंग थंड पडले आहे असे सांगितले व गावातील मंडळी घरातील आरडाओरडा ऐकून घरा जवळ आले व ताबडतोब पांडुरंग चव्हाण यास पुढील उपचारासाठी गेवराई शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.परंतु पांडुरंग चव्हाण यांचा जागीच मृत्यु झाल्याने त्यास गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले असता शवविच्छेदन दरम्यान त्यांच्या गळाला खुणा आढळून आल्या. त्यामुळे हा घातपात असल्याची शक्यता नातेवाईकांकडून वर्तवली जात आहे. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.