क्राईम

सावधान ! शेतकर्‍यांनो गेवराई तालुक्यात बोगस खताचा साठा चकलांबा पोलिसांनी केला जप्त, अजूनही बोगस खत, बियाणांचा धंदा सुरूच

गेवराई —  शेतकरी पेरणी साठी खते व बियाणे खरेदी करण्याच्या गडबडीत असल्याची संधी साधून खत कंपन्या व भामटय़ांच्या मार्फत बोगस खते व बियाणे मार्फत बाजारात आणत असल्याचा प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला असून मंगळवारी ता. 1 रोजी पौळाची वाडी तालुका गेवराई येथे एका ट्रकमधून तब्बल बारा टन बोगस खत जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गेवराई तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोगस खताचा प्रकार समोर आला या प्रकरणात कंपनीच्या मालकासह घेऊन चालक व क्लिनर यांच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मेहल कुमार भगवान भाई ( वय 31) रा. गुरुवार पेठ पुणे या खत कंपनी मालकासह ट्रक चालक संदिपान वैजनाथ खाडे व ऋषिकेश ज्ञानोबा खाडे दोघे राहणार वंजारवाडी तालुका गेवराई अशी आरोपींची नावे आहेत. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तालुका कृषी अधिकारी संजय कुमार ढाकणे यांना पौळाची वाडी येथून एका ट्रक मधून क्रमांक एम.एच. बारा एचडी 24 94 या मधून बोगस खते आणले गेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पौळाची वाडी येथे जाऊन ट्रकमधील खतांची तपासणी केली असता ते बोगस असल्याचे निष्पन्न झाल. रॉयल प्रायव्हेट लिमिटेड , वन प्लस फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड कोतोली अंकलेश्वर जिल्हा भरूच, गुजरात या वितरण कंपनीच्या ऑरगॅनिक व ऑर्गानिक न्यू खताच्या पिशव्या मिळाल्या, याबाबत ट्रक ट्रक चालक आणि क्लीनर कडे विचारणा केली असता त्यांनी हा सारा माल व वस्तू कोठे जात आहे. याबाबत कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाहीत शिवाय त्याबाबतची सबळ कागदपत्रे दाखवली नाहीत त्या नंतर हा बोगस खताचा साठा चकलांबा पोलिस ठाण्यात जमा केला. संबंधितांनी खते नियंत्रण कायदा 1985 अन्वये उत्पादकाकडून विकर त्याला दिला विक्रेत्याला दिला जाणारा फॉर्म व इतर आवश्यक कागदपत्रांचा अभाव आढळून आल्याने खते नियंत्रण आदेशाच्या कलम 19 मधील तरतुदीचे उल्लंघन झाल्याने कलम 80 c नुसार 12 टन खताचा साठा जप्त करण्यात आला. सदर विनापरवानगी विक्री करत असल्याने तसेच बॅग वर नमूद केलेले घटक हे रासायनिक खत नियंत्रण आदेश यामधील अधिसूचित घटकापेक्षा भिन्न असल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे पंचनामा करून कंपनीच्या मालकाच्या ट्रक चालक व क्लिनर यांच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात कृषी अधिकारी संजयकुमार यांच्या फिर्यादीवरून खत नियंत्रण आदेश अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close