राजकीय

खा.सुप्रियाताई सुळे यांना अपशब्द प्रकरण; राष्ट्रवादीचे आंदोलन

मंत्री अब्दुल सत्तारांचा जाहीर निषेध--आ.संदीप क्षीरसागर(Sandeep kshirsagar)

बीड — राज्याचे कृषीमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आमच्या नेत्या तसेच लोकसभेच्या खासदार संसदरत्न खा.सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल गालीच्छ वक्तव्य केले आहे. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हनन करते. या वक्तव्याबद्दल मंत्री अब्दुल सत्तारांचा आम्ही जाहिर निषेध करतो अशी प्रतिक्रिया आ.संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. मंगळवार (दि.८) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

          शिंदे गटाचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खा.सप्रियाताई सुळे यांच्यावर 50 खोक्यावरून टिका केली होती. या दरम्यान अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल गलिच्छ शब्दांचा उल्लेख केला होता. एका जबाबदार संवैधानीक पदावर असलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे निषेधार्ह आहे. खा.सुप्रियाताई सुळे या आमच्या नेत्या असून त्यांच्या बद्दल कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जे वक्तव्य केले आहे

 त्याबद्दल त्यांनी जाहिर माफी मागावी. अशा प्रकारचे गलिच्छ वक्तव्य तेही एका महिलेबद्दल करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर आहे. सत्तारांची सत्तेची मस्ती ही जास्त दिवस नसणार आहे. अब्दुल सत्तारांची सत्तेची मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे आम्ही सर्व पदाधिकारी उतरवल्याशिवाय शांत बसणार नाहीत, खा.सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी निषेध व्यक्त करतांना आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे. तसेच अब्दुल सत्तार यांच निषेध व्यक्त करण्यासाठी मंगळवार (दि.८) रोजी बीड येथे आ.संदीप‌ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, काळे झेंडे दाखवत आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी-कॉंग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button