कृषी व व्यापार

ऊस गाळपात जयभवानी राजकारण करणार नाही – अमरसिंह पंडित(AmarSingh pandit)

जय भवानीच्या( Jay Bhawani sugar mil )40 व्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ

पुढील अनेक वर्ष ऊस उत्पादकांसाठी सुकाळ – पंजाब डख

गेवराई — अनेक वर्ष या भागात चांगले पर्जन्यमान राहणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी सुकाळ ठरणार असल्याचा हवामान अंदाज सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी व्यक्त केला. जय भवानीची गाळप क्षमता वाढल्यामुळे कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक राहणार नाही, ऊस गाळपात कोणतेही राजकारण जय भवानी करणार नसल्याचे प्रतिपादन चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले. जय भवानीच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख, ह.भ.प. शिवाजी महाराज, माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्यासह कारखान्याचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी, ऊस वाहतुकदार, सभासद आदी उपस्थित होते.

या कारखान्याच्या नावात जय आहे आणि त्याला भवानी मातेचा आशिर्वाद आहे त्यामुळे कारखान्याचे भविष्य उज्वल आहे. चेअरमन अमरसिंह पंडित यांनी शेतकर्‍यांच्या हितासाठी कारखान्याची गाळप क्षमता वाढविली असल्याने शेतकर्‍यांनी चिंता करण्याचे कारण नाही. येणार्‍या काळात हवामान चांगले राहणार असुन पुढील अनेक वर्ष पाऊस काळ उत्तम राहणार आहे हे सांगतांना हवामान विषयक अंदाजाच्या अनेक अभ्यासपुर्ण युक्त्या हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी आपल्या भाषणादरम्यान दिल्या. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. जय भवानीच्या ४० व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्य अतिथी म्हणुन पंजाब डख बोलत होते. श्रीक्षेत्र नारायणगड संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. शिवाजी महाराज, कारखान्याचे संस्थापक शिवाजीराव (दादा) पंडित, चेअरमन अमरसिंह पंडित, व्हा. चेअरमन जगन्नाथ शिंदे, माजी चेअरमन जयसिंग पंडित यांच्यासह कारखान्याचे संचालक, सभासद, विविध संस्थांनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गव्हाणीमध्ये विधिवत ऊसाची मोळी टाकुन उत्साहात गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

जयभवानीची गाळप क्षमता वाढवितांना यंत्र सामुग्रीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला असुन त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होणार आहे. अनेक ठिकाणी संगणकीय प्रणालीचा वापर केल्यामुळे कर्मचार्‍यांना हस्तक्षेप करता येणार नाही. यावर्षी साडे नऊ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवुन आम्ही काम करत आहोत. अतिशय कमी वेळेत अथक परिश्रम घेवुन कामगार व कर्मचार्‍यांनी गाळप क्षमता वाढविण्याचे विक्रमी काम केलेले आहे. मागील वर्षी जय भवानीच्या इतिहासातील सार्वाधिक ऊस गाळप करण्यात आले, यावर्षीपासुन साखरे बरोबरच उप पदार्थांचे उत्पादन होणार असल्यामुळे जय भवानी इतरांच्या तुलनेत ऊसाला अधिकचा भाव देण्यास सज्ज आहे असे सांगुन अमरसिंह पंडित यांनी ऊस गाळपात राजकारण करणार नसल्याचे आपल्या भाषणात निक्षुन सांगितले. त्यांनी जय भवानीच्या कामगार आणि कर्मचार्‍यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांनी कारखान्याची तांत्रिक माहिती दिली. यावेळी कारखाना साईटवर पोहचलेल्या पहिल्या वाहन मालकाचा रोख रक्कम देवुन गौरव करण्यात आला. अतिशय कमी कालावधीत नविन टरबाईनची यशस्वी उभारणी केल्याबद्दल अभियंता नरेंद्र देशमुख व सुरज बिचके यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ह.भ.प. शिवाजी महाराज यांचे आशिर्वादपर भाषण झाले. कार्यक्रमाला जय भवानीचे सभासद, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतुक ठेकेदार, कामगार, कर्मचारी, वाहन मालक यांच्यासह विविध संस्थानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भवानीच्या ४० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अतिशय उत्साहात संपन्न झाला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button