राजकीय

अंधेरी पोटनिवडणुकीतून चर्चेत ‘आलेल्या NOTA’चा विक्रम लातूरच्या नावावर

मुंबई — अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके 53 हजार 471 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.त्यांना एकूण 66 हजार 247 मते पडली, तर ‘नोटा’ला (NOTA) 12 हजार 776 मते पडली त्यामुळे नोटाला पडलेल्या मतांची चांगलीच चर्चा होत आहे. मात्र आतापर्यंत नोटाने यापेक्षाही जास्त मते मिळवल्याचा विक्रम महाराष्ट्रातचं मराठवाड्यात झाला आहे

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील लातूर ग्रामीण मतदारसंघात नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती ती अंधेरी पोटनिवडणुकीच्या तुलनेत सुमारे दुप्पट म्हणजे 27500 मते पडली होती. यामुळे विधानसभा निवडणुकीतील ही सर्वाधिक नोटाला पडलेली मते आहेत. शिवाय लोकसभेसाठी-बिहारच्या गोपाळगंज मतदारसंघात 2019 मध्ये 51 हजार 660 मतं NOTA ला पडली होती. हा देखील एक मोठा विक्रम नोटाच्या नावावर आहे.
विधानसभा मतदारसंघांत नोटाला पडलेल्या मतांचा विचार केल्यास राज्यातील लातूर ग्रामीण मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक मतदारांनी नोटाला मते दिल्याचा विक्रम आहे.
2019 ला या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख विजयी झाले होते. त्यांना या निवडणुकीत 1 लाख 35 हजार मते मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकांची मते ही नोटाला मिळाली होती. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन देशमुख यांना 13, 524 इतकी मते मिळाली होती. आता अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) ऋजुता लटके यांच्यानंतर नोटाला 12,776 मतदारांनी मते दिली आहेत.दरम्यान, असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफाॅन्स या संस्थेने NOTA ला देशभर मिळालेल्या मतांच्या आधारे तयार केलेल्या अहवालात गेल्या पाच वर्षांत विविध लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये 1 कोटी 29 लाख मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारल्याची माहिती प्रसिद्ध केली असून त्यापैकी 64 लाख मतदारांनी विधानसभा निवडणुकांमध्ये नोटाचा पर्याय वापरल्याचे नमुद केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button