आपला जिल्हा

बीडकरांनो अजुनही वेळ गेली नाही सावध व्हा. आज पुन्हा तीन रुग्ण सापडले

बीडजिल्हा कोरोना मुक्ती पासून सात पावलं दूर असताना म्हणजेच सात रुग्ण उपचार घेत असताना पुन्हा आज पाठवलेल्या 54 स्वॅब मध्ये बीड शहरात तीन रुग्ण सापडले आहे. अजीजपुरा, जुना बाजार, कारंजा रोड मधील हे रुग्ण आहेत.

बीडकरांनो अजूनही वेळ गेलेली नाही अति आवश्यक आवश्यक असल्यासच घराच्या बाहे पडा. मास्क सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझरचा वापर करा आयुष्य खूप सुंदर आहे विनाकारण हिंडून कुटुंबाची व जीवनाची बरबादी करू नका हे वर्ष फक्त जगायच आहे. कोरोना गेल्यानंतर मग आपण नफा-तोटा कमाई याबद्दल विचार करू

संपादक —- सह्याद्री माझा

बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचीमालिका दोन-तीन दिवसापर्यंत खंडित होते मात्र पुन्हा रूग्ण सापडल्यामुळे चिंतेत भर पडली जाते. आज चार रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्यावर सात रुग्णांवर उपचार सुरु होते. ही संख्या देखील कमी झाली असती कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसत असतानाच आज पुन्हा बीड जिल्ह्याला धक्का बसला आहे आज 54 स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी अठ्ठेचाळीस जणांचे अहवाल निगेटिव आले आहेत एका स्वॅबचा कुठलाच निष्कर्ष निघाला नाही. दोघांचे स्वॅब रिजेक्ट करण्यात आले. तर तीन जण करुणा पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. आजीज पुरा येथील 29 वर्षीय महिला, जुना बाजार मधील 48 वर्षे पुरुष, तसेच कारंजा रोड वरील 66 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे उघडकीस आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close