क्रीडा व मनोरंजन

व्हॅली व्ह्यू इंटरनॅशनल स्कूलचा पुन्हा एकदा राज्य स्पर्धेमध्ये डंका

बीड — राज्यस्तरीय रॉक बॉल स्पर्धा सब ज्युनियर व सीनियर राज्यस्तरीय स्पर्धांचे सोलापूर या ठिकाणी आयोजन केले होते यामध्ये गेवराई तालुक्यातील सावरगावच्या  व्हॅली व्ह्यू इंटरनॅशनल स्कूलचा  मुलींनी बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पुणे संघाबरोबर अटीतटीची लढत देत राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये दुसरे स्थान पटकावले यामध्ये आपल्या शाळेच्या दोन मुलींची राष्ट्रीय स्पर्धा करता निवड झाली पुनम संदिपान वाघमारे व वैष्णवी बाळासाहेब क्षिरसागर… उत्कृष्ट खेळी व आक्रमक पवित्रा घेत या दोघींनी चुरशीची टक्कर देत पुणे संघाला जेरीस आणले. श्रद्धा नारायण जीगे घेणे उत्कृष्ट स्मॅश खेळत पहिल्या सेशनमध्ये बीड जिल्ह्याचे पारडे जड ठेवण्यासाठी मदत केली.. अक्षरा काचोळे व प्रिया दातखीळ हिने उत्कृष्ट बचाव तंत्र वापरत दुसऱ्या सेशन पर्यंत पुण्याच्या संघाला घाम फोडला..

पहिल्यांदाच झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सर्वात लहान गट परंतु सर्वोत्कृष्ट खेळ खेळणारा संघ म्हणून आपल्या शाळेच्या मुलींनी पाहुण्यांची वाहवा मिळवली .सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन व पालकांचे मनःपूर्वक धन्यवाद त्यांनी टाकलेल्या विश्वासामुळे आज पुन्हा एकदा राज्य स्पर्धेमध्ये आपण आपल्या शाळेचे नाव गाजवू शकलो . दोन मुलींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली ही एक पुन्हा विजयाची सुरुवात म्हणावी लागेल.. वरील खेळाडूंना नितीन जाधवर, सुधाकर जाधवर ,सारिका गव्हाणे व विजयश्री दराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
अॅड. विकास मिसाळ शाळेचे संस्थापक व संचालक तसेच श्री राजेंद्र डोंगरे बीड जिल्हा सचिव यांनी सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button